विधानसभेचे सदस्य; वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ:
शेलार हे 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते, जिथे ते वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत अनुक्रमे 26,911 मतांनी आणि 26,550 मतांनी विजयी झाले होते. विविध संस्कृतींच्या एकत्रित सरमिसळीने भरलेल्या या मतदारसंघावरील त्यांची पकड यावेळी दिसून आली. अनेक अर्थांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मुंबई शहराचे अर्करूप आणि सामाजिक जडणघडणीचे प्रतिबिंब आहे.
विधानसभेचे मुख्य अध्यक्ष:
शेलार यांची 2012 मध्ये विधानसभेचे मुख्य अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. विधानसभेच्या नियम आणि कार्यपद्धतीचे सुविहितपणे पालन करवून घेण्याची आणि त्याचबरोबर सदस्यांना त्यांचे विचार खुलेपणाने मांडण्याची संधी प्रदान करण्याची जबाबदारी शेलार यांनी यशस्वीपणे पार पाडली.
मुंबई भाजपचे अध्यक्ष:
शेलार यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुंबई शाखेचे सलग 2 वेळा नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. पक्षाची मूल्ये आणि विकासात्मक दृष्टीकोन मुंबईच्या गरजांनुसार राबवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबईत वाढलेले शेलार हे या पदासाठी योग्य ठरले कारण त्यांना मुंबई आणि मुंबईकरांच्या अनोख्या पैलूंची जवळून ओळख होती.
माजी शालेय शिक्षण मंत्री: जून-नोव्हेंबर 2019:
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारात, शेलार यांनी 2019 मध्ये शालेय शिक्षणाचे अंतरिम मंत्री म्हणून नेतृत्व स्वीकारले. राज्याच्या शिक्षणप्रणालीमध्ये सुधारणा करण्याबरोबरच आधुनिक आणि पारंपरिक शिक्षणाला सहजतेने एकत्रित करणारे धोरण विकसित करण्याचे कार्य त्यांनी केले.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य: जुलै 2012-ऑक्टोबर 2014:
शेलार यांची २०१२ मध्ये विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जिथे त्यांनी पक्षाची उद्दिष्टे आणि महाराष्ट्राच्या गरजांचे प्रतिनिधित्व करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.