राजकीय परिचय

राजकीय:

• सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून २६ हजार ९११ मताधिक्याने विजयी तर सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा २६,५५० मताधिक्य राखून विजयी.
• महाराष्ट्र विधानपरिषदेवर जुलै २०१२ रोजी आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमितभाई शाह आणि तत्कलीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या सन २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने ३३ जागांवरून तब्बल ८३ जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई भाजपाचे नेतृत्व केले.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपुर्वी सन २०१४ ला महागर्जना रॅली, बीकेसीतील मैदानात झाली. या रॅलीच्या नियोजनात आमदार ॲड. आशिष शेलार यांचा प्रमुख सहभाग होता.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शाह आणि तत्कलीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या लोकसभा २०१४ व विधानसभेच्या निवडणुकांमध्येही मुंबईतून भाजपाला मोठे यश मिळाले. त्यावेळीही आमदार अॅड. आशिष शेलार यांचे मुंबईतील नेतृत्व लक्षवेधी ठरले, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे सहा ही उमेदवार मोठया फरकाने विजयी झाले.
• मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून सन २०१३ पासून दोन टर्म काम करुन त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. विविध उपक्रम, आंदोलने आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे असल्याने भाजपातील एक सर्वसमावेशक आणि आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेप्रमाणे ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाने पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांना यश आले.
• त्यामुळे पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुन्हा तिसऱ्यांदा त्यांच्यावर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
• मुस्लिम, ख्रिश्चन अशा अल्पसंख्याक समाज घटकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यातून एक सर्वसमावेशक व आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
• मुंबई भाजपाचे अध्यक्ष तसेच विधानपरिषद आणि विधानसभेत आमदार म्हणून त्यांनी नागरी चळवळीत आपला विशेष सहभाग नोंदवला. रस्त्यावरच्या संघर्षाबरोबर त्यांनी सभागृहातही महाराष्ट्राच्या विविध विषयात अत्यंत अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्या.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर कर्नाटकांतील दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती. तर गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर सुरतमधील मतदारसंघांची जबाबदारी सोपविली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्या-त्या मतदारसंघात पक्षाला चांगले यश मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. तर, हैद्राबाद महापालिका निवडणुकीतही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती, तिथेही पक्षाला चांगले यश मिळाले. भाजपाकडून लोकसभा २०२४ ची तयारी सुरू झाली असून आता त्यांच्यावर कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
• मुंबईतील एलफिस्टन येथे रेल्वे पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर तातडीने संरक्षण मंत्र्यांना भेटून त्यांनी सैन्यदलामार्फत तातडीने पादचारी पुल उभारण्याची संकल्पना मांडली व त्यानुसार विक्रमी वेळेत हा पुल उभारला गेला. इतिहासात प्रथमच मुंबईत सैन्यदला मार्फत असे काम करण्यात आले.
• राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून त्यांना मिळालेल्या सुमारे सहा महिन्यांच्या कालखंडात त्यांनी १०० निर्णय घेऊन लक्षवेधी काम केले. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांमध्ये लोकप्रिय शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी लौकिक मिळविला.
• सतत मुंबईकरांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारा नेता अशी त्यांची ओळख असून गणेशोत्सव मंडळे, दहिकाला उत्सव मंडळे, नवरात्र उत्सव मंडळांचे वेळोवेळी प्रश्न सोडवून या पारंपारिक उत्सवांची परंपरा टिकली पाहिजे यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत लढत दिली.
• त्यांचे बालपण म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेले. त्यामुळे सध्या दुर्देशा झालेल्या या संक्रमण शिबिरांचा पुर्नविकास झाला पाहिजे, त्याच ठिकाणी रहिवाशांना मोफत घरे मिळाली पाहिजेत यासाठी त्यांनी पाठपुरवा करून अखेर तत्कलीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात संक्रमण शिबिराच्या पुर्नवसनाचे धोरण तयार करून घेण्यात त्यांना मोठे यश आले.
• त्याचप्रमाणे कोळीवाडे, गावठाणे यांचा पुर्नविकास व्हावा, त्यांच्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी, सीमांकन व्हावे यासाठी ते सतत पाठपुरावा करीत असून आजही हा लढा सुरू आहे.
• कोविड काळात विधिमंडळाचे अधिवेशन होत नव्हते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करुन त्यांनी भाजपाचे आमदार, खासदारांच्या वैयक्तीक भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेऊन पक्षाकडे त्याचा अहवाल सादर करण्यात त्यांना यश मिळाले.

 

भूषविलेली अन्य पदे:

• अभाविप, मुंबई सचिव
• भाजपा, युवा मोर्चा, मुंबई अध्यक्ष
• १९९५ भाजपा महाअधिवेशन कार्यकारिणी सदस्य (कोअर टीम)
• मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, (खार पश्चिम प्रभाग)
• भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष
• मुंबई महानगरपालिकेत भाजपा नगरसेवकांचे गटनेते
• सुधार समितीचे अध्यक्षपद भू्षविले
• सदस्य एमएमआरडीए
• मुंबई मेट्रो हेरीटेज सोसायटीचे गव्हर्नर
• वांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार.
• क्षत्रिय गडकरी मराठा महासंघाचे महाराष्ट्र समाज संस्थेमध्ये सक्रिय